Pune Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Fire News: पुण्यात विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला भीषण आग

Girls Hostel On Fire: सकाळी ९ च्या सुमारात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये ही घटना घडली.

Ruchika Jadhav

Pune:

पुणे शहरात ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना घडलीये. विद्यार्थिनी वसतिगृहात असतानाच ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसतिगृहाची ही इमारत एकूण ४ मजल्यांची आहे. सकाळी ९ च्या सुमारात पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच त्यांनी प्रथम मुलींना सुरक्षित बाहेर काढले. तसेच मजल्यावर आतमध्ये आणखी कोणी अडकले आहे का याची खात्री करून घेतली.

त्यानंतर जवानांनी सदर खोलीत आगीवर पाणी मारले आणि नियंत्रण मिळवले. या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तू पूर्णत: जळाल्यात. खोलीमध्ये असलेल्या हिटरमुळे आग लागल्याची प्राथमीक माहिती समोर आलीये.

महाड MIDCतील हेल्थकेअर कंपनीमध्ये भीषण स्फोट

रायगडमध्येही एक मोठी दुर्घटना घडलीये. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटामध्ये कंपनीत काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT