Black Magic Scare in Talegaon Saam Tv News
मुंबई/पुणे

अर्धा लिंबू, कुंकू अन् टाचण्या.. अजित पवार गटातील नेत्याच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

Black Magic Scare in Talegaon: एका अज्ञात महिलेने सुहास गरुड यांच्या घराबाहेर लिंबू, कुंकू व टाचण्या टाकून करणी करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Bhagyashree Kamble

  • तळेगाव दाभाडे येथे अज्ञात महिलेने NCP नेते सुहास गरुड यांच्या घरी करणी करण्याचा प्रयत्न केला.

  • लिंबू, कुंकू आणि टाचण्या वापरून हा प्रकार करण्यात आला होता.

  • हा अघोरी प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • गरुड यांनी महार वतनाच्या जागेच्या प्रकरणावर प्रकाश टाकल्याने त्यांच्यावर रोष होता, अशी शक्यता व्यक्त.

सुशिक्षत आणि नागरी सजगतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. भयंकर जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुहास गरूड यांच्या घरी एका अज्ञात महिलेनं लिंबू, कुंकू आणि टाचण्यात वापरून करणी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करणी करून घटनास्थळीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, आरोपीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास संबंधित महिला अघोरी साहित्य घराच्या परिसरात टाकून तिथून पळ काढताना दिसते. सुहास गरुड यांनी अलीकडेच मावळ परिसरातील मोठ्या प्रमाणातील महार वतनाच्या जागांवर सुरू असलेल्या वादग्रस्त अतिक्रमण प्रकरण उघडकीस आणले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना अनेक धमक्याही प्राप्त झाल्या असून, जादूटोण्याचा हा प्रकार त्या रागातूनच केल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

मात्र, अशा प्रकारामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या प्रकाराबद्दल तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच अज्ञात महिलेचा शोध घेऊन तिला अटक करावी अशी मागणी गरुड यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT