पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या डागणार ठाकरे सरकारवर तोफ Saam Tv
मुंबई/पुणे

पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या डागणार ठाकरे सरकारवर तोफ

दोन दिवसांनंतर कोल्हापूर दौरा करेल - किरीट सोमय्या

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई - मंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif यांच्या तथाकथित घोटाळ्याची अधिक माहिती मिळविण्यासाठी मुंबई Mumbai हुन कोल्हापूरकडे निघालेले किरीट सोमय्या सकाळी पहाटे 4 वाजता कऱ्हाड मध्ये उतरले. कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस Notice किरीट सोमय्या Kirit Somaiya यांना बजावण्यात आली होती. कोल्हापूर Kolhapur जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे किरीट सोमय्या ज्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर कडे निघाले होते त्या गाडीत पुण्यामध्येच दाखल झाले.

हे देखील पहा -

किरीट सोमय्या यांच्याशी चर्चा करत अप्पर पोलीस आयुक्त यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदीची नोटीस देत कऱ्हाड मध्ये उतरण्याची विनंती केली. यानंतर किरीट सोमय्या हे कऱ्हाड मध्ये उतरले.

दरम्यान, पोलिसांनी किरीट सोमय्या यांना सर्किट हाऊस येथे थांबवले आहे. आज ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास किरीट सोमय्या हे पत्रकार परिषद घेणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आणखी एक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषदे नंतर पोलिसांकडून मुंबई मध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे सरकारने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला असला तरीही दोन दिवसांनंतर कोल्हापूर दौरा करेल असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

छोट्या पडद्यावरील 'युधिष्ठिर' बनावट जाहिरातीला फसले अन् गमावले हजारो रुपये; पोलिसांनी चक्रे फिरवत ठगांकडून अशी वसूल केली रक्कम

मुंबईच्या वेशीवर बिबट्याची धडक; मीरा भाईंदरमधील इमारतीत घुसून तरुणीवर हल्ला

बांग्लादेश पुन्हा पेटले, हिंदूची हत्या, विद्यार्थी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार

SCROLL FOR NEXT