OBC Reservation : घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या; अन्यथा पुढे ढकला - छगन भुजबळ Saam TV
मुंबई/पुणे

OBC Reservation : घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या; अन्यथा पुढे ढकला - छगन भुजबळ

सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे की, निवडणूका घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, नाहीतर पुढे ढकला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाच्या प्रकरणावरती आज छगन भुजबळ यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले, 'सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे की, निवडणूका घ्यायच्या तर संपूर्ण निवडणूका घ्या, नाहीतर निवडणूका पुढे ढकला; असं प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

तसेच टप्याटप्यांमध्ये निवडणूक घेता येणार नाही, अन्यथा सर्व निवडणूक पुढे ढकला, इम्पीरिकल डेटा आम्ही देतो. तो गोळा होईपर्यंत निवडणूक घेण्याची परवानगी द्या. राज्य सरकार (State Goverment) निवडणुकांबाबत कोर्टासमोर दोन भूमिका मांडणार सुप्रीम कोर्टासमोर (Supreme Court) आम्ही जात आहोत. सुप्रीम कोर्टात राज्यसरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत असही भुजबळ म्हणाले.

तोपर्यंत निवडणुका घेऊ नये -

ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत ही मागणी करणार, अथवा ओबीसी स्थगिती न देता संपूर्ण निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी. अशी विनंती करणार असून निवडणूका दोन टप्प्यात घेण्याने चुकीचा पायंडा पडेल असही ते म्हणाले.

पुढील आठ महिन्यात इम्पिरीकल डेटा (Imperial Data) आम्ही सादर करू असे न्यालायला सांगणार सांगणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय आपण आज दिल्लीला जाणार असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, हीच भूमिका राज्यसरकार सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT