मुंबई/पुणे

मुस्लीम मुलींना विकण्याच्या जाहिराती पसरवणाऱ्यांवर कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

मुस्लीम महिला (Muslim Women) पत्रकार, RJ तसंच ट्विटरवरुन आपले मतं व्यक्त करणाऱ्या मुलींना टार्गेट करत चक्क त्यांना विकण्याचे ट्विट केली जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : आजकाल सोशल मिडियाचा (Social Media) वापर लोक कोणत्याही कारणासांठी करताना पाहायला मिळत असतनाच समाजातील काही विकृत प्रवृत्तींनी चक्क मिडियाचा गैरवापर करत मुलींना विकायला काढल्याचा निंदनिय प्रकार सुरु केला आहे. मुस्लीम महिला (Muslim Women) पत्रकार, RJ तसंच ट्विटरवरुन आपले मतं व्यक्त करणाऱ्या मुलींना टार्गेट करत चक्क त्यांना विकण्याचे ट्विट केली जात आहेत. आणि यावरती काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे, या घटनेबाबत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांना वारंवार विनंती करूनही ह्या मुलींना विकण्याच्या जाहिराती बनवणाऱ्या हँडल विरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याचं चतुर्वेदी यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान या सर्व घटनेवरती गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे ट्विटद्वारे (Tweet) सांगितले आहे. 'डिजिटल प्लॅटफॉर्म महिलांना उद्देशून दुराचार आणि जातीय द्वेषाने भरलेले आहेत. हे खूप त्रासदायक आणि लज्जास्पद असून महाराष्ट्र शासन अशा प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई करत आहे. त्यासाठी मी @MahaCyber1 ला निर्देश दिले' असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच ट्विटरवरील मुस्लिम मुली ज्या भूमिका मांडतात त्यांना ट्रोल करण्यासाठी त्यांना विकत घेण्याच्या जाहिराती देण्यात आल्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडल्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसानी या प्रकरणी FIR दाखल केला असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT