Ranjit Savarkar News Saam TV
मुंबई/पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत यांना भाजप आमदारकी देण्याची शक्यता

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप ही आमदारकी देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Savarkar) सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांचे वारस रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांना आमदारकी देणार असल्याची शक्यता असल्याची माहीती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्या जागी भाजप-शिंदे गटाने राज्याला पर्यायी सरकार दिलं. तसंच भाजप-शिंदे गट एकत्र आला याचं मुख्य कारण हिंदुत्व (Hindutva) असून याच मुद्द्यावर आमचं एकमत असल्याचं दोन्ही गटातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजीत सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. संघ (RSS) आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती असून सावरकर यांना संधी देऊन हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या नावाला सहमती देतील अशी माहीती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

रणजित सावरकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती -

रणजीत सावरकर हे व्यवसायाने इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडिओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता.

रणजीत सावरकर यांनी 'सावरकरस्मारक डॉट कॉम' (SavarkarSmarak.com) या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचं मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी १२ भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ब्रेल लिपीतही सावरकर साहित्य उपलब्ध आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदावरून शिवसेना आक्रमक,तडजोडीला नकार – अरविंद मोरे

Vastu Shastra : घरात झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तूशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

Shocking: लटकलेल्या अवस्थेत वडील, तर जमिनीवर आईचा मृतदेह; घरातील दृश्य पाहून सगळेच हादरले

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

SCROLL FOR NEXT