Pune Swargate Shivshahi Bus case 
मुंबई/पुणे

Pune Swargate : बलात्कार प्रकरणानंतर स्वारगेट डेपो अनसेफच, साम रिअॅलिटी चेक मध्ये धक्कादायक वास्तव

Pune Shivshahi Bus case : स्वारगेट बस डेपोमध्ये मंगळवारी पहाटे २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना घडली. नराधम दत्ता गाडे त्यानंतर फऱार झाला. पण ४८ तासानंतरही स्वारगेट बस डेपो सेफ नसल्याचे समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Pune Swargate Shivshahi Bus case : स्वारगेट बसडेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्यानंतर पुण्यात एकच संतापाची लाट उसळली. बलात्काराच्या घटनेनंतर साम टीव्हीने स्वारगेट बस (Pune Crime Swargate st depot) आगाराची रियालिटी चेक केली, त्यामधून धक्कादायक माहिती उघड जाली. बलात्काराची घटना घडल्यानंतर 24 तासही होत नाही तोच पुन्हा दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र यातून स्पष्ट होत आहे.

साम टीव्हीने मध्यरात्री दीड वाजता स्वारगेट बस स्थानकाचे रियालिटी चेक केलं. त्यावेळी अनेक धक्कादायक चित्र पाहायला मिळालं. स्वारगेट बस स्टेशनवर ज्या ठिकाणी तिकीट काऊंटर आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लाईट नाही. महिला बसलेल्या होत्या त्यांना भीती वाटत होती. त्याच बाजूला अनेक पुरुष झोपलेले पाहायला मिळाले. त्या ठिकाणी लाईट कुठे दिसली नाही.

ज्या गाडीत घटना घडली त्या गाडीच्या बाजूला पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. स्वारगेट मधील बसला तर त्या ठिकाणी लाईट नाही.. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक आहेत. पोलीस कर्मचारी घटना घडलेल्या गाडीला पहारा देत होते.. त्याचबरोबर लोकांची विचारपूस ही करत होते. स्वारगेट डेपोमध्ये गर्दुल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. हे गर्दुल्ले पाहून महिलांना ही भीती वाटतेय. महिला प्रवाशांनी आपल्या मनातील भिती कॅमेऱ्यासमोर बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: उद्यापासून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT