Mumbai News  Saam Tv
मुंबई/पुणे

Jitendra Awhad News : कोळशेवाडी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत केली कारवाईची मागणी

या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होणार, पोलिसांचे स्पष्टीकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

Latest Mumbai News : कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात एका इसमाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. दीपक भिंगारदिवे अस या मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक भिंगारदिवे यांची पत्नी नंदा या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत. दीपक यांच्या मुलाला कोळशेवाडी पोलिसांनी चौकशी पोलीस ठाण्यात आणले होते.

याबाबत भिंगारदिवे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असं सांगितलं .तर या प्रकरणी डीसीपी सचिन गुंजाळ यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होणार असून कुणावरही अन्याय होणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं .

कल्याण (Kalyan) पूर्व कोळशेवाडी पोलीस ठाण्यात काल रात्री ऑल आऊट ऑपरेशन सुरू होते. त्याअंतर्गत प्रशिक भिंगारदिवे या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. आपल्या मुलाला का आणले याबाबत विचारणा करण्यासाठी वडील दीपक भिंगारदिवे हे पोलीस ठाण्यात आले. दरम्यान पोलीस विचारपूस करत असताना दीपक आपल्य मोबाईलमधून शूटिंग करत होते

यांच दरम्यान त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. काही वेळाने दिपक भिंगारदिवे यांना फिट आली. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले. दरम्यान डॉक्टरांनी (Doctor) त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी भिंगारदिवे कुटुंबियानी दीपक यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

व्हिडियो काढताना पोलिसांनी (Police) मारहाण केल्याने दीपक यांचा मृत्यू झालाय. पोलीसच दीपक यांच्या मृत्यूला जबाबदार असून आम्हाला न्याय पाहिजे अन्यथा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे कुटुंबीयाने स्पष्ट केले.

दरम्यान, याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केले आहे. पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करत न्याय देण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी मात्र आरोप फेटाळून लावताना कुणावरही अन्याय होणार नाही या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

SCROLL FOR NEXT