Survey on Anti Adulteration of Edible Oil Saam TV
मुंबई/पुणे

Pune: खाद्यतेल भेसळविरोधी सर्वेक्षण; भेसळ करणाऱ्यांवर होणार कारवाई

सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष मोहिमांच्या माध्यमातून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेद्वारे तपासणीसाठी घेतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे : खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेला संदर्भात पुणे विभागात येत्या 14 ऑगस्टपर्यंत खाद्यतेल (Edible Oil) भेसळ विरोधी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासने दिली आहे. (Food and Drug Administrations)

सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विशेष मोहिमांच्या माध्यमातून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेद्वारे (Laboratory) तपासणीसाठी घेत असते.

याच धर्तीवर नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात खाद्यतेल, वनस्पती तेल तसेच बहु-स्रोत खाद्यतेलाच्या अनुषंगाने सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ -

3 ऑगस्टपासून ही मोहीम राबविण्यात येत असून 14 ऑगस्टपर्यंत स्थानिक व नामांकित मोठ्या नाममुद्रेचे (ब्रॅंड) नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे. बहु-स्रोत खाद्यतेलाची विक्री ॲगमार्क परवान्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे याबाबत देखील तपासणी करण्यात येणार आहे. तसंच सुट्टे खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असून सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत 3 व 4 ऑगस्ट या कालावधीत पुणे विभागात खाद्यतेलाचे 46, वनस्पतीचे 1 व बहु-स्रोत खाद्यतेलाचे 3 असे एकुण 50 सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सर्वेक्षण नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रेत्याकडून नियमित अन्न नमुने घेऊन कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे ग्रँड टूरसाठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT