ओमायक्रॉनच्या संसार्गाबाबत मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण SaamTvNews
मुंबई/पुणे

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ओमायक्रॉन (Omicron) विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) शहरात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. त्यामध्ये अतिजोखामिच्या देशातून आलेल्या प्रवाश्यांपैकी १७ प्रवाश्यांचे कोविड (Covid) निदान झाले असून त्यामध्ये १३ पुरुष व ४ स्त्रिया यांचा समावेश आहे. सदर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहे. तसेच सर्वेक्षण मध्ये ९ नागरीकांचे (४ पुरुष, ५ स्त्रिया) ९ कोविड निदान झाले असून त्यात एक ओमायक्रॉन बाधित आहे.

हे देखील पहा :

या व्यतिरिक्त मुंबई विमानतळावर दि. ०६.१२.२०२१ पर्यंत अतिजोखामिच्या देशामधून ४८४५ प्रवाश्यांचे आगमन झाले असून त्यापैकी विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांपैकी ६ मुंबई निवासी प्रवाश्यांचे कोविड निदान झाले असून त्यामध्ये सर्व पुरुष आहेत. सदर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनाही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या आरोग्य विभागाच्या वतीन सर्व जनतेला करण्यात येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT