Supriya Sule
Supriya Sule  Saam Tv
मुंबई/पुणे

'महिलांवर हात उगाराल तर हात तोडू', सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. पुण्याच्या (pune) बालगंधर्व मंदिरात स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादीच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनी घुसून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांना मारहाण (Beating) करण्यात आली.

हे देखील पाहा-

अमित शाह (Amit Shah) यांच्या आयुष्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केले आहे. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने- सामने आले. यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. राष्ट्रवादी नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाणही करण्यात आली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर राजकीय नाट्य रंगले आहे.

पुण्यात भाजपच्या ३ कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल झाली असून राष्ट्रवादीच्या काही जणांवरही तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यावेळी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारणाऱ्या भाजपला सुळे यांनी चांगलेच सुनावले आहे. हे राज्य शाहू, फुले आंबेडकरांचे आहे. त्यामध्ये महिलांवर झालेले अन्याय आम्ही सहन करणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला गरज पडली तर, कोर्टात जाऊ आणि ऐकायला तयार नसतील तर अशा लोकांचे हात तोडून हातात देऊ, असे सुप्रिया सुळेंनी इशारा दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

SCROLL FOR NEXT