Nawab Malik SaamTvNews
मुंबई/पुणे

नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही; ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मात्र, ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत मलिकांनी कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नवाब मलिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला माही. ईडीने आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हणत नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण आज सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असे कोर्टाने यावेळी संगीत्याले आहे.

हे देखील पहा-

मागील महिन्यात १५ मार्च दिवशी मुंबई हायकोर्टाने देखील नवाब मलिकांची (Nawab Malik) ही याचिका फेटाळून लावली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी दिवशी ईडीने अटक केली होती. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने (ED) दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून करण्यात आली होती.

नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही, मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर असलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यानंतर मलिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचिका फेटाळून लावल्याने नवाब मलिक यांना एक मोठा झटका बसला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT