Superstition Crime In Pune Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! पती, सासू, सासऱ्यांसमोर मांत्रिकाने महिलेला घातली नग्न आंघोळ

Pune Crime News: पुण्यातील एका मांत्रिकाने एका महिलेवर उपचारांच्या नावाखाली नग्न करुन आंघोळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: सांस्कृतिक नगरी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune) अंधश्रद्धेचं (Superstition) ग्रहण लागलंयं. पुण्यातील एका मांत्रिकाने एका महिलेवर उपचारांच्या नावाखाली नग्न करुन आंघोळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील भानामती नाहीशी व्हावी, व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी आणि घरांमध्ये सुख शांती नांदावी याकरता पुण्यातील मांत्रिकाने महिलेला नग्न आंघोळ घातली. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात चाललंयं तरी काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. (Pune Crime News)

हे देखील पाहा -

धक्कादायक बाब म्हणजे, मांत्रिकाने सासू-सासर्‍यांसमोर आणि पतीसमोर महिलेला नग्न होऊन आंघोळ करायला लावले. पीडितेला घरातल्या सगळ्यांसमोर मांत्रिकांने तिला नग्न आंघोळ घातल्याने माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुरोगामी महाराष्ट्रातील पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेचा पती, सासरे, सासू यांच्यासह मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

या महिलेचा २०१३ मध्ये विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून घरातील मंडळींनी या महिलेला त्रास देऊन तिच्याबरोबर अनिष्ट प्रथा सुरू केल्या होत्या. आरोपींनी मांत्रिक बाबा जमादार यांच्या सांगण्यावरुन पीडित महिलेला रायगड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी नेलं. तिथं तिला मांत्रिकासह सर्व मंडळींच्या समोर नग्न होऊन अंघोळ करण्यास भाग पाडले. या धक्कादायक प्रकारानंतर पुणे शहरात चाललंयं तरी काय असा सवाल उपस्थित होतो.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT