sunetra pawar ncp  Saam tv
मुंबई/पुणे

राज्यातील राजकारण फिरणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

sunil shelke : राष्ट्रवादीत विलीनीकरणाला वेग आलाय. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य असेल तर त्यांना सर्व दरवाजे मोकळे असल्याचे सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

दिलीप कांबळे

अजितदादांच्या निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील विलीनीकरणाच्या चर्चांना वेग

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचं शेळके म्हणाले

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्रात राजकारणात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गटातील विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य असेल, तर त्यांना सर्व दरवाजे मोकळे आहेत, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. सध्याच्या परिस्थितीत पक्षाच्या भविष्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे, असे स्पष्ट भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटलं.

'सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत असेल, तर तो आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. त्याचबरोबर त्यांचे नेतृत्व मान्य नसेल, त्यांनी पक्ष सोडण्याचा पर्याय निवडावा, असा इशाराही शेळके यांनी दिला.

अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी अजूनही जाणवत असल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या कार्याची आठवण करून दिली. बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंघ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनीही भाष्य केलं. मंत्री उदय सामंत म्हणाले, 'तिकडे पण स्पर्धा सुरू आहे. तिकडे पण कळेल कोण जिंकेल. अजित पवार गेल्यावर मी चर्चा करायची गरज नाही'. उदय सामंत यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय भाष्य करेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT