मुंबई/पुणे

NCP Political News : बारामतीत सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार? वारजे भागातील बॅनरमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण

Political News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनरवर संसदेचा फोटो दिसत आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Baramati News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बारातमी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ आहे. सध्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना येथून कोण आव्हान देणार याकडे सर्वाचं लक्ष आहे. (Latest Marathi News)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या येथून निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक खरंच लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र कार्यकर्त्यांची याबाबचे बॅनर झळकवण्यास सुरुवात केली आहे. (Political News)

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनरवर संसदेचा फोटो दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे बॅनर लागले आहेत.

बॅनरवर सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा, असा उल्लेख करण्यात आला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उमेदवार असणार का? ही चर्चा आता आणखी जोर धरु लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

SCROLL FOR NEXT