Mumbai Local Mega Block  Saam Tv
मुंबई/पुणे

Mega Block : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक, कसं आहे वेळापत्रक? वाचा

Mumbai Local Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर अनेक अभियांत्रिकी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे.

Yash Shirke

Mumbai Mega Block : मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक राहणार आहे. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी गरजेचे आहेत. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०

सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत अप आणि डाउन हार्बर मार्गावर

सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन सेवा रद्द राहतील.

सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉकच्या कालावधीमध्ये पनवेल - कुर्ला - पनवेल या दरम्यान विशेष सेवा ट्रेन चालवल्या जातील. हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि वेस्टर्न लाईन स्टेशनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT