Pune Collector Suhas divase  
मुंबई/पुणे

Pune New Collector: पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती

Pune Collector: पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आलीय. दिवसे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारावा असे आदेशही राज्य सरकारने काढले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नितीन पाटणकर, पुणे

Pune New Collector Suhas Divase :

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आलीय. डॉ. राजेश देशमुख पुण्याचे आधीचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तर सुहास दिवसे यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

पुण्याचे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने आज काढले. दिवसे यांनी विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडून तत्काळ पदभार स्वीकारावा असे आदेशही राज्य सरकारने काढले आहे. दिवसे हे सध्या राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून कार्यरत होते तर पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची दिवसे यांच्या जागेवर नवीन क्रीडायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

Pune Collector Suhas divase

दिवसे यांनी याआधी पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून देखील काम केलेले आहे तसेच ते पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात पी एम आर डी एचे आयुक्त म्हणून देखील काम पाहिलेले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील यांच्या जवळील अधिकारी म्हणूनही दिवसे ओळखले जातात दिवसे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आहेत.

दिवसे यांच्या नियुक्तीला शिवसेना शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींचा विरोध होता राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुण्यामध्ये त्यांनी पहिली बदली दिवसे यांची केली होती शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिवसे यांच्या पीएमआरडीए च्या आयुक्त पदावरुन उचलबांगडी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावंतवाडी ​मळगाव घाटात कार दरीत कोसळली ७ जण जखमी

Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस देणार उमेदवार; 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

Chhatrapati Shivaji Maharaj History: लूट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत हेच शहर का निवडलं?

सुखी संसाराच्या स्वप्नांची क्षणांत राखरांगोळी; १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

SCROLL FOR NEXT