मलंगगड भागात वाहनांवर तरुणांचे जीवघेणे स्टंट सुरूच ! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

मलंगगड भागात वाहनांवर तरुणांचे जीवघेणे स्टंट सुरूच !

जीवघेणे स्टंट करणाऱ्या स्टंटबाजांना आवर घालण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

प्रदीप भणगे

कल्याण : मलंगगड परिसरात सध्या वाहनांवर जीवघेणे स्टंट करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी तीन तरुणांनी केलेला जीवघेणा स्टंटचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा एका तरुणाचे चारचाकी वाहनावर बसून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे अश्या स्टंटबाजांना आवर घालण्याचे आव्हान सध्या पोलीस यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे.

हे देखील पहा -

शहरी भागात वाहनांवर स्टंट करता येत नसल्याने सध्या स्टंटबाज हे ग्रामीण भागात फिरकत असल्याचे समोर आलं आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा मलंगडच्या कुशीवली गावाजवळ, मलंगगड ते कुशीवली प्रवास चक्क चारचाकीच्या टपावर बसून केल्याचे व्हिडीओतून समोर आले आहे.

या तरुणाने चारचाकी वाहनावर बसून हा जीवघेणा स्टंट केल्याचे समोर आल्याने या तरुणाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी या तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण देत जीवघेणे स्टंट करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Breast Cancer Symptoms: स्तनामध्ये दिसणारी गाठ म्हणजेच कर्करोग नाही; त्वचेवर दिसणारी ब्रेस्ट कॅन्सरची ही ५ लक्षणं वेळीच ओळखा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक प्रकृती बिघडली, ठाण्यातील रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

Panvel Fort : पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासप्रेमींनी वीकेंडला करा भटकंती

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT