Alankar Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचा वॉशरूममधील व्हिडिओ चित्रित

या घटनेमुळे शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोपाळ मोटघरे, अश्विनी जाधव केदारी

पुणे - अलंकार पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. घरात विद्यार्थ्याला शिकवणी शिकवायला आलेल्या शिक्षिकेचे व्हिडिओ अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. १६ वर्षाच्या अल्पयीन विद्यार्थ्याने आपल्याच घरातील वॉशरूम मध्ये मोबाईल ठेवून शिक्षिकेचे व्हिडिओ आपल्या मोबाईल (Mobile) कॅमेरामध्ये कैद केला आहे. शिक्षिकेचा (Teacher) व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी विद्यार्थ्यानेच वॉशरूम मध्ये मोबाईल फोन लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात उघडकीस आल आहे.

हे देखील पहा -

तसेच शिक्षिका विद्यार्थ्याला घरी शिकवत असताना अल्पयीन विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या छातीचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचं पिडीत शिक्षिकेने आपल्या फिर्यादीत लिहिलं आहे. या प्रकरणात पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलाविरोधात विनयभंग आणि आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT