Nitin Raut Saam Tv
मुंबई/पुणे

वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; मागण्यांवर उर्जामंत्र्यांची सकारात्मक मान्यता

2 दिवसांपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता, याबाबत आज चर्चा झाली.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांवरती मेस्मा अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असे सांगीतले होते.परंतु आज झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक तोडगा निघाला आहे. मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याबाबत उर्जामंत्र्यांनी आश्वासन दिले होते की सूडभावनेनं कोणावरही कारवाई होणार नाही. जलसंधारण खात्यातील विद्युत प्रकल्पाच्या खाजगीकरणाबाबत हे प्रकल्प उर्जाविभागाच्या अखत्यारित ठेवण्याचं सांगण्यात येत आहे.

2 दिवसांपासून वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता, याबाबत आज चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की चर्चा समाधानकारक झाली. संप स्थगीत करत आहोत. उर्जा कंपन्यांमध्ये खाजगीकरण होणार नाही याचे आश्वासन उर्जा मंत्र्यांनी दिले आहे. सर्व मागण्यांवर उर्जामंत्र्यांनी सकारात्मक मान्यता दिली आहे. ३-४ दिवसांत पुढील कारवाई होईल. संप केल्यानं कोणत्याही कामगारावर कारवाई होणार नाही असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

खालील मागण्यांवर चर्चा...

१) खाजगीकरण प्रक्रीया होणार नाही

२) ६ हायड्रोपॉवर स्चेशन खाजगी कंपन्यांनांण्याबाबत चर्चा

३) बदली धोरणासंदर्भात एकतर्फी निर्णयावर विस्तृत निवेदन देतील

चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवणार नाहीन

४) कंत्राटी कामगारांना संरक्षण

५) नोकर भरतीत कंत्राटी कामगारांना संरक्षण द्यावं

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

'कौन बनेगा करोड़पती'च्या शुटिंगवेळी मोठा अपघात; अमिताभ बच्चन पाय घसरून पडले, बिग बींना उभंही राहता येईना

Latest Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स, जे तुम्हालाही नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT