police  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: नात्याला काळिमा, घरातील एकट्या तरुणीवर पडली वाईट नजर; सावत्र आजोबाने केलं संतापजनक कृत्य

Mumbai Crime News in marathi : : मुंबईतून धक्कदायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवलीत सावत्र आजोबाने १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार केला आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

मुंबई : मुंबईतून धक्कदायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवलीत सावत्र आजोबाने १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार केला आहे. कांदिवलीच्या कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीत गेल्या १० वर्षांपासून सावत्र आजोबा १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अत्याचाराची बाहेर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी तरुणीला दिली होती. त्यामुळे गेली अनेक वर्ष तरुणी अत्याचार सहन करत होती. मात्र, पोलिसांत या घटनेची तक्रार नोंद होताच पोलिसांनी ५८ वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

तरुणी घरात एकटी असताना सावत्र आजोबा १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करत होते. गेल्या १० वर्षांपासून या सावत्र आजोबाकडून अत्याचार सुरु होता. या आजोबाकडून २०१४ पासून अत्याचार सुरू होते. तरुणीवर अत्याचार या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर या आजोबाला बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. (Mumbai News)

बोगस डॉक्टरने केला तरुणीवर अत्याचार

नालासोपारा येथे एका बोगस डॉक्टरने २२ वर्षीय तरुणीवर उपचाराच्या नावाखाली अत्याचार केला आहे. डॉ. बाबासाहेब पाटील असं या डॉक्टरचे नाव आहे. या आरोपीचा नालासोपारा पश्चिमेच्या छेडानगरमधील गौरव गॅलक्सी इमारतीत दवाखाना आहे.

उपचारासाठी आलेल्या तरुणीवर पाटील याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करून अत्याचार केला. या प्रकरणी बाबासाहेब पाटील याच्याविरोधात बलात्कार (कलम ३७६) आणि विनयभंगाचा (कलम ३५४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

SCROLL FOR NEXT