Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

अफजल खान वध देखाव्याच्या परवानगीवर ठाकरे गटातील नेते म्हणाले, पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात...

'दहीहंडी पथकातील गोविंदांनी अफजलखानाचा वधाचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला होता.'

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अफजल खान वध देखाव्याची परवानगी मागितली अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हे नाकारण्याचे कारण नाही असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी केलं.

तर अफजलखान वधाच्या देखाव्याला बंदी फक्त पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील परवानगी दिली जात नसल्याचं शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले. काल सायंकाळी शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावली होती या बैठकीनंतर ते बोलत होते.

यावेळी बोलताना जाधव म्हणाले, 'शेतकऱ्यांकरिता कष्टकऱ्यांकरता हे सरकार काय निर्णय घेते यावर आमदार शिवसेनेची भूमिका सभागृहात मांडतील. सुप्रीम कोर्टात तारखेवर तारखा मिळतात त्याच्यावर चर्चा झाली महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली आहे, त्यावर चर्चा झाली.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC) संदर्भात, अतिवृष्टीत शेतकऱ्याला मदत कशी मिळेल यावरही चर्चा झाल्याचं जाधव यांनी सांगितलं. तसंच गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. अफजलखान वधाची परवानगी मागितली अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) केला असून ते नाकारण्याचे कारण नाही असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.

पाहा व्हिडीओ -

तर विधिमंडळात काय चाललंय याबद्दल आमदारांची चर्चा केली आढावा घेतला गेला ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता शासन म्हणून का मान्य होत नाही, याबाबत उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला असल्याचं शिवसेना नेते सचिन अहिर यांनी सांगितलं. अहिर म्हणाले, 'राजकीय हस्तक्षेप करून निवडणुका पुढे घेऊन जात असतील महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी नसने घटनेप्रमाणे योग्य नाही, लोकांचा प्रतिनिधी नसणं हे देखील योग्य नाही.

गोविंदाचा मृत्यू हे तीन दोन तीन गोविंदांपैकी जे अत्यवस्था आहेत त्यातील एकाचा मृत्यू झाला. जांभोरी मैदानात ज्यांनी नियोजन केलं त्यांनी खाली गाद्या ठेवल्या नाहीत, रुग्णवाहिकेची देखील व्यवस्था नव्हती. मंडळाच्या लोकांनी त्याला ऍडमिट केलं दुर्दैवाने या जखमी गोविंदांकडे बिल मागितले जात आहे.

लहान मुलांना घेता येत नाही तरी देखील गोविंदा मध्ये अनेक लहान मुलांचा समावेश होता थरांची उंची देखील मर्यादित ठेवली पाहिजे होती. मात्र, ते देखील पाळलं नाही उंचीला स्पर्धा नका करू दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पक्षातला कोणीही या गोविंदांना जाऊन भेटून आले नाहीत.

अफजल खान वध जे हिंदुत्वासाठी आम्हाला सोडून गेले ते चकार शब्द देखील काढत नाहीयेत कोणताही लोकप्रतिनिधी आवाज उठवताना पाहायला मिळत नाही. गोविंदामध्ये अफजलखानाचा वध चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मग फक्त गणेशोत्सवातच अफजलखान वधाच्या देखाव्याला बंदी का? तसंच फक्त पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील या देखाव्याला परवानगी दिली जात नसल्याचं अहिर म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT