Shivneri Fort stampede news update Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

Shiv Jayanti history and significance : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मोठी गर्दी झाली असताना अरुंद दरवाजाजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. काही शिवभक्त जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

रोहिदास घाडगे, जुन्नर प्रतिनिधी

Shivneri Fort stampede news update : छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह सुरू आहे. राज्यभरातूल शेकडो शिवसैनिक शिवनेरी दर्शनासाठी येत आहे. या उत्साहाला गालबोट लागलेय. शिवनेरीवर मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली. किल्ल्यावरील अंबरखाना परिसरातील अरुंद दरवाजात शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीची (Stampede) परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत काही शिवभक्त जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यरात्री शिवनेरी नेमकं काय झालं?

शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यांच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद दरवात गर्दी अवाक्याबाहेर झाली. शिवभक्तांचा ओघ वाढला होता. जागा अरुंद असल्याने आणि लोकांची संख्या प्रमाणाबाहेर गेल्याने एकमेकांना ढकलाढकली सुरू झाली अन् चेंगराचेंगरीची स्थिती झाली. गर्दीच्या ठिकाणी पोलिस प्रशासन किंवा प्रशासन अनुपस्थित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

काहीजण जखमी -

या दुर्घटनेत जखमी झालेल्या शिवभक्तांना तातडीने किल्ल्याखाली आणण्यात आले. तात्काळ रूग्णवाहिका बोलवून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर जुन्नर आणि मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

भगव्या लाटेत न्हाऊन निघाली शिवजन्मभूमी

किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण शिवनेरी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून भगव्या रंगात न्हाऊन निघालेले हे शिवभूमीचे दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. 'जय जिजाऊ, जय शिवराय'च्या घोषणांनी गड दुमदुमला असून भक्ती, उत्साह आणि अभिमानाचा संगम झाल्याचे चित्र शिवनेरीवर पाहायला मिळत आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गावागावांमधून शिवभक्त सायकल रॅलीसह पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर पोहोचले आहेत. 'हर हर महादेव!', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय!' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभरातून शिवज्योती किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहेत. या सोहळ्यातून ऊर्जा मिळत असल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा, वाहतूकीत महत्त्वाचे बदल

Success Story: IAS व्हायचं म्हणून गावकऱ्यांनी खिल्ली उडवली, सुलोचना डगमगली नाही; हिम्मतीनं UPSC क्रॅक केली अन् कलेक्टर झाली, वाचा सक्सेस स्टोरी

Muslim Reservation: मुस्लीम समाजाला मोठा धक्का; मुस्लीम आरक्षण फडणवीसांकडून रद्द

Relationship Tips: हे ५ संकेत दिसले तर समजा तुमचा पार्टनर ब्रेक-अप करण्याचा विचार करतोय

Puranpoli: होळीला नैवेद्य करताना पुरणपोळी नेहमी फुटते? मग वापरा ही आजीने सांगितलेली टिप, वाचा ही सिक्रेट टिप

SCROLL FOR NEXT