ST Strike : ST कामगारांचा संप बेकादेशीर; न्यायालयाचे शिक्कामोर्तब (पहा व्हिडीओ) Saam TV
मुंबई/पुणे

ST Strike : ST कामगारांचा संप बेकादेशीर; न्यायालयाचे शिक्कामोर्तब (पहा व्हिडीओ)

कामगारांनी संप पुकारल्यामुळे ST चे चाक था़ंबले होते. यात राज्यशासनाचे आर्थिक मोठं नुकसान तर झालेच मात्र नागिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. हा संप बेकादेशीर (Illegal) ठरविण्यासाठी महामंडळ प्रशासनाने मुंबईसह राज्यभरातील सर्व कामगार न्यायालयात तक्रार दाखल केल्या आहेत.

सुरज सावंत

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारा़च्या विलनीकरणाचा लढा बेकायदेशीर असल्याचा निर्णय कामगार न्यायालयाने (Labor Court) दिला आहे. कामगारांनी संप पुकारल्यामुळे ST चे चाक था़ंबले होते. यात राज्यशासनाचे आर्थिक मोठं नुकसान तर झालेच मात्र नागिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. हा संप बेकादेशीर (Illegal) ठरविण्यासाठी महामंडळ प्रशासनाने मुंबईसह राज्यभरातील सर्व कामगार न्यायालयात तक्रार दाखल केल्या आहेत.

पहा व्हिडीओ -

यासंदर्भात मुंबईच्या कामगार न्यायालयात (Labor Court of Mumbai) दाखल केलेल्या तक्रारीवर आज सोमवार, दि.17 जानेवारी 2022 रोजी सुनावणी झाली असता न्यायालयाने विलिनीकरणाच्या मागणीसाठी ST कामगारांनी पुकारलेला संप बेकायदेशीर ठरवला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने आतापर्यत कामगारांविरोधात केलेल्या निलंबन, सेवासमाप्ती तसेच बडतर्फ सारख्या कारवाया वैध ठरणार आहेत. कामगार न्यायालयात एसटी महामंडळाच्यावतीने ॲड. गुरुनाथ नाईक जोरदार युक्तिवाद करत प्रशासनाची बाजू भक्कमपणे मांडली.

विशेष म्हणजे यापूर्वी औद्योगिक न्यायालयाने देखील २९ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार कामगारांनी कोणत्याही बेकायदेशीर संपावर जाऊ नये असे निर्देश दिले होते. तरीही कामगारांचा संप सुरुच होता मात्र आता न्यायालयानेच हा संप बेकायदेशी ठरवला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

SCROLL FOR NEXT