SSC Exam Saam Tv
मुंबई/पुणे

SSC Exam Hall Ticket : दहावीच्या विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा; 'या' तारखेपासून उपलब्ध होणार हॉलतिकीट

दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट कधी मिळणार याची तारीख जाहीर झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

SSC Exam Hall Ticket : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट कधी मिळणार याची तारीख जाहीर झाली आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा २ मार्च पासून सुरु होत आहे. त्यामुळे परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना हॉलतिकीट मिळणार याची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली आहे. (Latest Marathi News)

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हॉलतिकीटाची तारीख जाही केली आहे. त्यानुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपासून ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईवरून विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार आहे. हॉलतिकीट उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी जोमाने करावी लागणार आहे.

कॉपी बहाद्दरांना दणका मिळणार

दरम्यान, दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा (Exam) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विद्यार्थी देखील परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. विद्यार्थ्यांसोबत बोर्ड देखील परीक्षेसाठी सज्ज झालं आहे. दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या असा शिक्षण (Education) मंडळाचा आग्रह आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने कडक पावलं उचलण्याचा पवित्रा घेतला आहे.

कॉपी बहाद्दरांना दणका देण्याची तयारी आता शिक्षण मंडळाने केली आहे. परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता फौजदारी कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने असा इशारा दिला आहे

उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावं लागणार?

राज्य शिक्षण मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

या संदर्भातील पत्र देखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे. आतापर्यंत 10 मिनिटे उशीर झाला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु याचा गैरफायदा विद्यार्थ्यांकडून घेतला जात असल्याचं निदर्शनास आल्याने मंडळाने हा निर्णय घेतला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जात पडताळणी समिती कायमची रद्द करा - मनोज जरांगे

Gold Price Today: सोनं पुन्हा झालं स्वस्त! ३ दिवसांत मोठी घसरण, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT