File Photos Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Bangalore Highway News: वाहन चालकांनो लक्ष द्या! मुंबई- बंगळुरू हायवेवरून प्रवास करताय, तर नवीन नियम जाणून घ्या

कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान जड, अवजड वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी आता प्रतितास ४० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित केली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव

Pune News: वाहन चालकांसाठी महत्वाचं वृत्त हाती आलं आहे. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान जड, अवजड वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांसाठी आता प्रतितास ४० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. (Latest Marathi News)

मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीने कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात पाहणी करुन अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. त्यात अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

या समितीच्या बैठकीत वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याच्या मूळ गंभीर मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार कात्रज बोगदा ते नवले पूल परिसरात जड, अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ४० किलोमीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यात ट्रॅक्टर-ट्रेलर कॉम्बिनेशन, ट्रक-ट्रेलर, मल्टी अॅक्सल वाहने, कंटेनर, मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा समावेश आहे.

या निर्णयाची १९ मे ते २५ मे या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात नागरिकांनी काही सूचना असल्यास पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, येरवडा, पुणे यांच्या कार्यालयात २६ मे रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात असे आवाहन केले आहे.

जड, अवजड वाहनांमध्ये कोणत्या वाहनांचा सामावेश आहे?

जड, अवजड वाहनांना मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा निश्चित केली आहे. या महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रेलर कॉम्बिनेशन, ट्रक-ट्रेलर, मल्टी अॅक्सल वाहने, कंटेनर, मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा सामावेश आहे. या महामार्गावर वाहनांना वेगमर्यादा प्रतितास ४० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT