Ghatkopar Hoarding Collapse, Satish Singh Special Story Saam Tv
मुंबई/पुणे

Special Story: गॅस भरायला पंपावर गेले आणि एका क्षणात सगळं संपलं! घाटकोपर दुर्घटनेनं नालासोपाऱ्याचं कुटुंब पोरकं केलं

साम टिव्ही ब्युरो

Ghatkopar Hoarding Collapse:

घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग जेव्हा कोसळलं, तेव्हा त्याखाली 52 वर्षांच्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सतीश सिंह यांच्या कुटुंबाला काय माहीत होतं की, आपलं घर चालवणारा व्यक्तीही याच होर्डिंग खाली चिरडला जाईल आणि त्यात त्याचा मृत्यू होईल. कुणी कल्पनाही करु शकत नाही, अशी घाटकोपरची ही थरारक दुर्घटना १४ लोकांचा जीव घेऊन गेली आणि कित्येकांना पोरकं करु गेली. नालासोपऱ्याचं हे कुटुंबंही त्यापैकी एक आहे.

सतीश सिंह हे नेहमीप्रमाणे गाडीच सीएनजी भरायला पेट्रोल पंपावर गेले असता त्यांच्यावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. यातच सतीश सिंह यांचा दुर्दैवी अंत झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाने पाहिलेल्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली.

सतीश सिंह टॅक्सी चालवायचं काम करायचे. सिंह एका सामान्य कुटुंबातले असून पत्नी आणि तीन मुलं असा त्यांचा परिवार आहे. दिवसभर टॅक्सी चालवायची, राबराब राबायचं.. कष्ट करायचे... कुणासाठी? तर घरासाठी. पण याच घरासाठी राबत असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि सिंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

होर्डिंग जेव्हा कोसळलं तेव्हा सतीश सिंह हे त्यांच्या टॅक्सीत गॅस भरायला पेट्रोल पंपावर आलेले होते. पण अवाढव्य होर्डिंग कोसळल्यानंतर कित्येक जण त्याखाली चिरडले गेले आणि काही कळायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं.सतीश हेही याच होर्डिंग दुर्घटनेचे शिकार ठरले.

सतिश सिंह यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं आहेत. घरातला कर्ता पुरुषच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलाय. त्यामुळे आता जगायचं कसं? कमावणार कोण? आयुष्याचा गाडा हाकायचा कसा? असे अनेक प्रश्न या कुटुंबाला पडले आहेतच. पण या प्रश्नांआधीही... सकाळी घरातून निघालेली व्यक्ती.. जी नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी येईल, अशा अपेक्षेत घरातले त्यांची वाट पाहत होते. पण आता ती व्यक्ती कधीच आपल्यासोबत नसणार आहे, यावर विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतोय. या कुटुंबासोबत नियतीने केलेली क्रूर थट्टा काळजाचे तुकडे करणारी आहे.

होर्डिंग खाली गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. लोखंडाचे गज ज्या वेगाने पेट्रोल पंपवर आदळले असतील, त्याच वेगाने आपलं घर चालवणाऱ्या माणसाचा मृत्यू झालेल्याची आलेली बातमीही सिंग कुटुंबीयांना हारदवणारीच होती. नालासोपाऱ्याचा या कुटुंबाला आता सरकारी मदत मिळेलही. पण आपला माणूस गमावलेल्यामुळे मनावर झालेली खोलवर जखम कशी भरुन निघेल.. हा प्रश्नच आहे..!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT