Special Report Saam Digital
मुंबई/पुणे

Special Report : मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाबबंदी; विद्यार्थिनींची याचिका कोर्टानं फेटाळली

Hijab Ban : चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजनं ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी लागू केली आहे. हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावलीय.

साम टिव्ही ब्युरो

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबईतल्या एका कॉलेजमधल्या हिजाबबंदीचा वाद मुंबई हायकोर्टात गेला. विद्यार्थिनींनी हिजाबबंदीविरोधात याचिका केली. मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली. हा वाद नेमका का सुरू झाला आणि कोर्टानं याचिका का फेटाळली त्यावरचा हा रिपोर्ट

चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजनं ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाबवर बंदी लागू केली आहे. हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावलीय. हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. मात्र,याचिकेतील आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं. कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं कॉलेजचं म्हणणं आहे.

चेंबुरच्या ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी, एनजी आचार्य आणि डी. के. मराठे कॉलेजकडून हिजाबवर बंदी, एक समान ड्रेसकोडसाठी हिजाबवर बंदी लागू करण्याचा निर्णय कॉलेजनं घेतलाय. यात मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याचं कॉलेजनं युक्तीवाद केला. तर महाविद्यालयाने घालून दिलेला नियम हा आमच्या धर्माचं पालन करण्याच्या अधिकाराचं, गोपनीयतेच्या अधिकाराचं आणि निवडीच्या अधिकाराचं उल्लंघन करतो.तसंच हा नियम विकृत असल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला होता.

मात्र मुंबई हायकोर्टानं कॉलेजनं घातलेली हिजाबबंदी योग्यच असल्याचा निकाल देत विद्यार्थिनींची याचिका फेटाळून लावली. कर्नाटकात अशाच पद्धतीत हिजाबबंदीचा वाद उफाळला होता.कर्नाटकमध्ये हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादानं हिंसक वळण घेतल्याची घटना फार काही जुनी नाही. कोणी कुठे काय कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत भाग झाला. मात्र आपण जेव्हा एखाद्या संस्थेचा भाग होतो. ड्रेस कोडं शाळेच्या शिस्तीचा भाग असल्याचं स्पष्ट आहे. सर्वधर्म समभाव या उक्तीनुसार सर्वांना समान ड्रेसकोड असणं हे न्यायालयालाही मान्य असल्याचं स्पष्ट झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT