Mumbai NEws  Saam TV
मुंबई/पुणे

Ganeshostav 2023 : मुंबईत 10 दिवस रात्रभर बिनधास्त फिरा, गणेशोत्सवात रात्री विशेष बसेसची सोय

Mumbai Ganpati Festival 2023 : गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने या दहा दिवस विशेष बसेसची सोय केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News :

गणेशोत्सावाला अवघा एक दिवस उरला आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. गणेशोत्सवात 10 दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांतून गणेशभक्त मुंबईत दाखल होतात. गणेशोत्सवात मुंबईत रात्रीही मोठी गर्दी पाहायला मिळते.

मुंबईतील अनेक मंडळाचे गणपती, विद्युद रोषणाई, डेकोरेशन पाहण्यासाठी नागरिक रात्रीचे मुंबईत फिरतात. अशा गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने या दहा दिवस विशेष बसेसची सोय केली आहे.

मंगळवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी बेस्टतर्फे 19 ते 27 सप्टेंबर या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत 27 बसेस सोडण्यात येणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

सीएसएमटी ते सायन, वरळी ते काळाचौकी, नागपाडा ते ओशिवरा, शिवडी ते दिंडोशी, पायधुनी ते विक्रोळी, नागपाडा ते शिवाजी नगर, म्युझियम ते देवनार, गिरगाव ते सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि म्युझियम ते शिवडी या विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत.

गणसेवकांची नियुक्ती

गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवरही ताण असतो. मात्र यंदा पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त केले जाणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीसोबत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Bigg Boss 19: 'आम्हा दोघांना चंद्र...'; बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने दिली प्रेमाची कबूली; म्हणाली...

Crime: भयंकर! शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; भिवंडी हादरले

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट केला नाही, तो दहशतवादी नाही, ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Mahima Chaudhary Wedding: 52 व्या वर्षी बोहल्यावर चढणार महिमा चौधरी? कोण आहे तिचा नवरा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT