'मागेल तेवढे पैसे देत नाही', म्हणून आईचा खून; वडिलांना ही जीवे मारण्याचा प्रयत्न मंगेश कचरे
मुंबई/पुणे

'मागेल तेवढे पैसे देत नाही', म्हणून आईचा खून; वडिलांना ही जीवे मारण्याचा प्रयत्न

इंदापूर (Indapur) तालुक्यातील काझड गावात मुलाने आई-वडिलांवर धारदार कोयत्याने वार करून आईचा खून केला तसेच वडिलांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मंगेश कचरे

मंगेश कचरे

बारामती : इंदापूर (Indapur) तालुक्यातील काझड गावात मुलाने आई-वडिलांवर धारदार कोयत्याने वार करून आईचा खून केला तसेच वडिलांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

'मागेल तेवढे पैसे देत नाही', म्हणून आईचा खून; वडिलांना ही जीवे मारण्याचा प्रयत्न

याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये (Walchandnagar Police Station) वडील पांडुरंग बाबुराव नरुटे यांनी फिर्याद दिली. अमित पांडुरंग नरुटे यांने तुम्ही मला मागेल तेवढे पैसे देत नाही तुम्ही माझे आई वडील नाहीत. तसेच मला जमीन वाटून देत नाही, या कारणावरून वडील पांडुरंग नरुटे यांना खून करण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांने मारहाण करून तसेच त्याच्या हातातील लोखंडी धारदार कोयत्याने मारहाण केली.

हे देखील पहा-

त्यामध्ये पांडुरंग नरुटे यांच्या दोन्ही हाताच्या अंगठ्यास व डाव्या हाताच्या दंडावर वार करून गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला असून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आई आलका पांडुरंग नरुटे (वय 55) यांच्यावर लोखंडी धारदार कोयत्याने तोंडावर, कपाळावर, डाव्या डोळ्यावर, नाकावर वार करून गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला यामध्ये वालचंदनगर पोलिसांनी अमित पांडुरंग नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT