कोल्हापुरला जाण्यापासून रोखणाऱ्या पोलीसांविरोधात सोमय्यांनी दाखल केली तक्रार... Saam Tv
मुंबई/पुणे

कोल्हापुरला जाण्यापासून रोखणाऱ्या पोलीसांविरोधात सोमय्यांनी दाखल केली तक्रार...

किरीट सोमय्या यांनी आता कोल्हापुरला जाताना अडवणूक करणाऱ्या पोलीसांविरोधात राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे.

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करणारे किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांना कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर जाण्यापासून २० सप्टेंबरला पोलिसांनी रोखलं होतं. त्यावेळी हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. मात्र या घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी आता अडवणूक करणाऱ्या पोलीसांविरोधात राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने मुंबई (Mumbai) पोलीस आयुक्त, आझाद मैदान विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुनावणीची नोटीस जारी केली आहे. (Somaiya lodged a complaint against the police for preventing him from going to Kolhapur)

हे देखील पहा -

याप्रकरणी पुढील सुनावणी १९ जानेवारीला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राधिकरणाकडे तक्रार करण्यापूर्वी वरिष्ठ पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार करणे आवश्यक असते. त्यानंतर एक महिन्यांनी कारवाई झाली नाही, तर तक्रारदार याप्रकरणी प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतो. सोमय्या यांनी यापूर्वी याबाबत कोणत्याही वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्याकडे तक्रार केली नव्हती. या तांत्रिक बाबींमुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या यांनी उपायुक्त (परिमंडळ-१) कार्यालयात याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी प्राधिकरणाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या (Complaint) आधारे प्राधिकरणाने ही सुनावणीची नोटीस जारी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT