BJP-MNS Saam TV
मुंबई/पुणे

...तर येत्या निवडणुकांमध्ये मनसे भाजपसोबत असेल; प्रवीण दरेकर

भोंग्यांच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ही भूमिका घेतली होती, RSS विश्वहिंदू परिषदेनेही भोंग्यांबाबत हीच भूमिका घेतली तेव्हाही तीच होती आणि आताही तीच आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका भाजपशी जुळती राहिली तर येत्या निवडणुकांमध्ये मनसे भाजप सोबत असेल असं वक्तव्य भाजपनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, 'भाजपच्या नेत्यांनी अडकावण्याचा प्रयत्न होता, महाविकास आघाडीचे नेते आत आहेत म्हणून खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.

'किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हा पळणारा नेता नाही, भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना पळून लावणारा नेता आहे.' सेशन कोर्टात जामीन मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जामीन मागतील असंही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्याचा समाचार त्यांनी घेतला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले. शरद पवार यांच्या घरावरील मोर्चा महाविकास आघाडीचा डाव होता का असा सवाल उपस्थित होतो अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर दिली.

हे देखील पाहा -

तर, भोंग्यांच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी देखील ही भूमिका घेतली होती. RSS विश्वहिंदू परिषदेनेही भोंग्यांबाबत हीच भूमिका तेव्हाही तीच होती आणि आताही तीच आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. भोंग्यांच्या आवाजाने प्रदूषण होत असेल तर कारवाई व्हायला हवी. शरद पवार यांच्या कार्यपद्धतीची माहिती राज ठाकरे यांनी करून दिली आहे. घरात धाडी पडल्या तरीही मोदींशी मधुर संबंध कसे असू शकतात हे सांगत राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राराज ठाकरे यांची भूमिका भाजपशी जुळती राहिली तर येत्या निवडणुकांमध्ये मनसे भाजप सोबत असेल असं मोठं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT