Building collapsed in Bhiwandi
Building collapsed in Bhiwandi Saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना सुखरूप काढलं बाहेर

Shivani Tichkule

Bhiwandi News: ठाण्यातील (Thane) भिवंडीमध्ये शनिवारी 3 मजली इमारत कोसळल्याची (Bhiwandi Building Collapsed) घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे. त्यापैकी 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली 22 जण अडकले होते त्यापैकी 18 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी (Bhiwandi Police) गुन्हा दाखल करत इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

नारपोली पोलिसांनी इमारत मालक इंद्रपाल पाटील यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. इंद्रपाल पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये अनेक खोल्या या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.

महत्वाचे म्हणजे, या कुमकुवत झालेल्या इमारतीवर मोबाईलचा टॉवर उभारण्यात आला होता. या इमारतीत तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या होत्या. ज्यामध्ये काही नागरिक भाड्याने राहत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासन करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री अकरा वाजता घटनास्थळाला भेट देत पाहणी केली होती. यावेळी त्यांनी इमारतीच्या ढिगार्‍याखाली (building collapse) अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना बचाव पथकाला दिल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

SCROLL FOR NEXT