Viral VIdeo  Saam TV
मुंबई/पुणे

Railway Dispute Video Viral: पोलिसांना कसं हैराण करायचं मला माहितीये, सिंहगड एक्सप्रेसमध्ये पुरुष प्रवाशाची महिला प्रवाशावर अरेरावी

Railway Dispute Video Viral: पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये खडकी ते लोणावळा दरम्यान जागेवरुन एका महिला आणि पुरुष प्रवाशामध्ये वाद झाला.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : रेल्वे प्रवासादरम्यान बसण्याच्या जागेवरुन होणारे भांडण हे नेहमीचंच बनलं आहे. अशा भांडणांचे अनेक व्हिडीओ समोर येतात. असा एक सिंहगड एक्सप्रेसमधील भांडणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमध्ये खडकी ते लोणावळा दरम्यान जागेवरुन एका महिला आणि पुरुष प्रवाशामध्ये वाद झाला. महिलांना बसायला जागा मिळत नसल्याने काही जणींनी एका व्यक्तीशी वाद घातला. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. (Viral Video)

बसण्याच्या जागेवरुन हा वाद झाला हे व्हिडीओवरुन स्पष्ट होतं आहे. भांडणामध्ये चुकी नेमकी कुणाही काही कळू शकले नाही. मात्र पुरुष प्रवासी महिलेशी अत्यंत उर्मटपणे बोलताना दिसत आहे. महिलेने पोलीस तक्रार करण्याची धमकी देताच, तुला जे करायचं ते कर असं पुरुष प्रवाशाने म्हटलं. (Latest Marathi News)

मी रोज पोलिसांना इथे बोलवतो. पोलिसांना कसं हैराण करायचं ते मी पाहतो. कोणताही टीसी, पोलीस येऊ दे त्याला कसं हैराण करायचं ते आम्हाला माहित आहे. कोण पोलीस कसा करप्शन कसा करतो ते मी एका मिनिटात पकडतो, अशी फुशारकी मारताना हा प्रवासी दिसत आहे. अन्य प्रवाशांना या दोघांचा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पुरुष प्रवासी जागा सोडण्यास तयार नसल्याचं चित्र दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesri Rajyog: 12 वर्षांनंतर बनतोय गजकेसरी राजयोग; गुरु-चंद्राच्या कृपेने मिळणार

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT