Gunratna sadavarte/Jayashree Patil Saam TV
मुंबई/पुणे

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय

Anticipatory Bail of Jayashree Patil : न्या. आर. एम. सादराणी यांनी निकाल राखून ठेवला आहे. उद्या दुपारी ३ वाजता अटकपूर्व जामिनावर कोर्ट निर्णय देणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओकवर या मुंबईतील बंगल्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील सहआरोपी आहेत. त्यामुळे अटक टाळण्यासाठी जयश्री पाटील यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी पूर्ण झाली असून न्या. आर. एम. सादराणी यांनी निकाल राखून ठेवला आहे. उद्या दुपारी ३ वाजता अटकपूर्व जामिनावर कोर्ट निर्णय देणार आहे.

वकील जयश्री पाटील यांच्यासह तीन एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर देखील कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांना कोर्टाकडून दिलासा मिळणार की नाही यावर उद्या कोर्ट निकाल देणार आहे. जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्यावरही सिल्वर ओक हल्ल्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अप्पर सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांच्या समोर याचिका दाखल केला आहे.

तसेच सिल्व्हर ओक हल्ल्या प्रकरणातील आरोपी गुणरत्न सदावर्ते आणि ११५ आंदोलक कर्मचाऱ्यांना अलीकडेच जामीन मिळाला आहे. सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तसेच सर्व ११५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी साधारण दुपारच्या सुमारास हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी धडक देत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. घटनेनंतर साधराणतः तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. दरम्यान, या घटनेत, आंदोलक कर्मचाऱ्यांना भडकवल्या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. या सर्व घटनेप्रकरणी गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत फूट? वाद मिटविण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका, VIDEO

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

SCROLL FOR NEXT