आजपासून मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली; पहा काय सुरू काय बंद? Saam Tv
मुंबई/पुणे

आजपासून मुंबईत रात्री 10 पर्यंत दुकानं खुली; पहा काय सुरू काय बंद?

राज्यात इतर शहरांमध्ये ही वेळ रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मुंबईमध्ये Mumbai आता कोरोना Corona रुग्णांची संख्या ही झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने नागरिकांना थोडा दिलासा देत काही निर्बंध शिथिल केले आहे. या दरम्यान मुंबईची लोकल Mumbai Local ही सर्वसामान्यांसाठी अद्याप खुली झाली नसली तरी सर्वसामान्यांना काही शिथिलता देण्यात येणार आहे. आता व्यापाऱ्यांना रात्री दहा पर्यंत दुकान खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात इतर शहरांमध्ये ही वेळ रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे.

दरम्यान, मुंबई मध्ये गेल्या २४ तासांत २५९ नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत ७,१२,३११ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या मुंबईमध्ये ४७४४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर १५०० दिवसांवर गेला आहे.

हे देखील पहा -

मुंबई मध्ये काय सुरू?

आठवडाभर दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहणार

हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये सोमवार- शनिवार ४ वाजेपर्यंत डाईन ईन खुले तर ४ नंतर होम डिलेव्हरी, पार्सल सेवा सुरु राहणार

सिनेमांच्या शूटिंगला परवानगी

ग्राउंड, गार्डन्स व्यायामासाठी सुरु

जिम, योगा केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेनं सोमवार ते शुक्रवार रात्री ८ तर

शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहणार

काय बंद असेल?

शॉपिंग मॉल हे बंद राहणार आहे.

धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळं बंद राहणार आहे.

राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक सोहळ्यावर बंदी

सिनेमागृह, नाट्यगृहं बंद स्विमिंग पूल बंद

खूप जवळ संपर्क येईल असे खेळ

मुंबई मध्ये कोविड 19 च्या नियमावलीमधून नागरिकांना मुभा देण्यात आली असली तरीही रविवारी अनेक गोष्टी बंद असणार आहेत. तसेच नागरिकांना लस घेतली असली तरीही मास्क घालणे, सोशल डिस्ट्न्सिंग पाळणे आणि हात सतत धुणे याचे पाळणं करने बंधनकारक राहणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT