आरोग्य भरतीच्या घोळाप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर; ऑडिओ क्लिप व्हायरल Saam TV
मुंबई/पुणे

आरोग्य भरतीच्या घोळाप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर; ऑडिओ क्लिप व्हायरल

आरोग्य भरतीच्या घोळाप्रकरणी आता काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणी नेक्सस असल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगेंनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: आरोग्य भरतीच्या घोळाप्रकरणी आता काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणी नेक्सस असल्याचा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगेंनी केला आहे. यात काही ॲाडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत ज्यात नोकरी मिळवून देण्यासाठी थेट पैशांची मागणी करत आपला न्यासाशी संपर्क असल्याचं लोक सांगत आहेत. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता पुढे येते आहे. नोकरी हवीये तर पैसे द्या ज्या गटात नोकरी त्या प्रमाणे पैसे अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आरोग्यभरतीची परिक्षा रद्द झाली आणि त्यावरून आता नवनवीन बाबी समोर यायला लागल्या आहेत.

माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी या प्रकरणी एक ॲाडिओ क्लिपच प्रसिद्ध केली आहे. या क्लिप मध्ये दोन लोकांचा संवाद आहे ज्यात मध्यस्थाला एजंट नोकरी लावण्यासाठी थेट पैशांची मागणी करतोय. याच्या नंतरचाही एक संवाद आता समोर आला आहे. ज्यतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. हा नेक्सस नक्की काय आहे? न्यासाचे असे एजंट फिरत होते का असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आता सीआयडी चौकशी करा अशी मागणी शेंडगेंनी केली आहे. या संबंधी आम्ही न्यासाशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. मात्र आत्ता पर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही. क्लिप तर व्हायरल झाल्या आहेत. चौकशीची मागणीही केली जातेय. आता सरकार याची दखल घेउन कारवाई करतंय का पहावं लागेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT