Navi Mumbai Rabale Sucide News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : मामानं भाचीचे अश्लील व्हिडिओ नवऱ्याला पाठवले, बघूनच हादरला, उचललं टोकाचं पाऊल!

Navi Mumbai Rabale Sucide News : नवी मुंबईतील रबाळे परिसरात २७ वर्षीय तरुणाने पत्नी आणि तिच्या मामाच्या कथित छळाला आणि ब्लॅकमेलला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पत्नी व मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नवी मुंबई येथे 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

  • इंस्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलचा संशय

  • पत्नी व तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल

  • पोलीस तपास सुरू

नवी मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने पत्नी आणि तिच्या मामाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटना नवी मुंबईतील रबाळे परिसरात घडली असून मृत तरुणाचे नाव विनोद तुपसौंदर (वर्षे २७) असे आहे. विनोदच्या पत्नीवर आणि तिच्या मामावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यामध्ये विनोदचा विवाह नाशिक येथील वैष्णवी नाटकर (वर्षे २५) हिच्याशी झाला होता. विवाहानंतर विनोद आणि वैष्णवी हे दोघे काही काळ एकत्र राहत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये शुल्लक कारणांवरून खटके उडतं होते.

वैष्णवी तिचा मामा संतोष ढगे याच्याशी मोबाइलवर वारंवार चॅटिंग करत होती, कॉलवर बोलत होती. ही बाब विनोदला समजल्याने त्यांच्यामध्ये वाद वाढले होते. वैष्णवी रागावून आपल्या आई-वडिलांकडे घर सोडून निघून गेली होती. त्याच दिवशी विनोदच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वैष्णवीचे अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आले.

संतोष ढगे यानेच हे व्हिडीओ पाठवल्याचा संशय मृत विनोदच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.या प्रकाराला कंटाळून विनोदने गळफास घेत २५ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली असल्याचं विनोदच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मामा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT