कल्याण पूर्वेत धक्कादायक घटना; 6 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, नराधम गजाआड! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण पूर्वेत धक्कादायक घटना; 6 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, नराधम गजाआड!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत.

प्रदीप भणगे

कल्याण : राज्यात महिला अत्याचारांची मालिका संपायचं नाव घेताना दिसत नाहीय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज कल्याण शहरात एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलीचा 51 वर्षीय इसमाने  विनयभंग  केल्याचा संतापजनक प्रकार कल्याण पूर्व परिसरात उघडकीस आला आहे.

हे देखील पहा :

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात माधव सांतरा या नराधमाविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल करत  त्याला अटक करण्यात आली आहे. माधव असे या इसमाचे नाव असून त्याचे याच परिसरात दुकान आहे.

काल संध्याकाळी पीडित 6 वर्षीय मुलगी त्याच्या दुकानात चिप्स घेण्यासाठी गेली होती. याच दरम्यान माधवने या चिमुकली सोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या या चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार पोलिसांनी माधवला अटक करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Antarwali Sarati : अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!

Fenugreek water: बडीशेप की मेथी? डिटॉक्स आणि वजन कमी करण्यासाठी कोणतं पाणी प्यावं?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा कडकडीत बंद

स्वप्नपूर्ती! १७ सप्टेंबरला बीडकरांना मिळणार सर्वात मोठे गिफ्ट; पुण्यासाठी सुटणार पहिली ट्रेन, 'या' तारखेला मुंबई जोडणार

बेकरीवरील कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची मागणी; लाच घेताना मुंबई महापालिकेच्या २ कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले

SCROLL FOR NEXT