डोंबिवलीत धक्कादायक घटना; सोफासेट मध्ये आढळला महिलेचा मृतदेह..! SaamTvNews
मुंबई/पुणे

डोंबिवलीत धक्कादायक घटना; सोफासेट मध्ये आढळला महिलेचा मृतदेह..!

संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. तेव्हा पत्नी घरात नव्हती आणि त्यांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली (Dombivli) पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे सकाळी कामावर गेले होते. दरम्यान त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती आणि मुलगा दुपारी साडे बारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. तेव्हा पत्नी घरात नव्हती आणि त्यांनी तिचा शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही. (Shocking incident in Dombivli; Woman's body found in sofaset)

हे देखील पहा :

मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली होती. तरी कुठे गेली आहे हे समजून आले नाही. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस (police) ठाण्यात पोहचले होते. दरम्यान शेजाऱ्यांना सोफा (Sofa set) विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आला आणि त्यांनी तो सोफा चाचपला. त्यावेळीच त्यांना धक्का बसला. कारण सुप्रिया हिचा मृतदेह (Death Body) सोफ्यात कोंबून ठेवला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.

सिनिअर पीआय शेखर बागडे, पोलिस निरिक्षक अनिल पडवळ आणि पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आता सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. अखेर तिची हत्या (Murder) कोणी व कशा करीता केली?  तिच्यासोबत काही गैर प्रकार झाला आहे का?  याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून विचारपूस सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT