Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News: महिला डॉक्टरचा भयंकर कारनामा, नर्सिंग होममध्येच मांडला बाळांच्या खरेदी विक्रीचा बाजार; उल्हासनगरातील धक्कादायक घटना

Ulhasnagar Woman Doctor Arrested: डमी ग्राहकाच्या माध्यमातून मुलांची खरेदी विक्री करताना पर्दाफाश

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये एक महिला डॉक्टरच नवजात बाळांची लाखो रुपयांना खरेदी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉक्टरने लहान मुलांच्या खरेदी विक्रीचा जणू बाजारच मांडला होता. कॅम्प नंबर तीनच्या कंवरराम चौक परिसरात असलेल्या महालक्ष्मी नर्सिंग होम मधील महिला डॉक्टर या आपल्या टोळीच्या माध्यमातून नवजात बाळाची खरेदी विक्री करत होत्या.  (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सानिया हिंदुजा ,सोनू पंजाबी यांना याची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारचा पर्दाफाश केलाय. दरम्यान नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या २२ दिवसाच्या बाळाला सात लाखांना डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे रेट या महिला डॉक्टरने (Doctor) ठरविले होते. आज २२ दिवसांच्या बाळाची विक्री ७ लाखात होणार होती. दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra) आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या बाळाची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये सहभागी आहे. सध्या महिला बालकल्याण विभाग आणि क्राईम ब्रँच अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत असून लवकरच एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Withdrawal: आता काही मिनिटांत काढता येणार PF खात्यातून १ लाख रुपये; सोपी आहे प्रोसेस; वाचा सविस्तर

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

Farm Benefits For Wife : पती-पत्नीच्या नावे शेती असल्यास, आता फक्त पत्नीलाच मिळणार लाभ | VIDEO

SCROLL FOR NEXT