pune news Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : अनैतिक संबंधात अडसर; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह पोत्यात घालून दुचाकीने नेलं अन्..

wife killed husband : अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीने पतीची हत्या केली आहे. पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकला. हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात घालून ५५ किलोमीटर दूर नेला. त्यानंतर रात्री दीड वाजता स्कुटरवर हडपसरपासून मृतदेह पुणे-सातारा रोडवर असणाऱ्या सारोळ्याला घेऊन गेले. त्यानतंर पतीचा मृतदेह नदीत फेकून दिला. सारोळ्यातील नीरा नदीत मृतदेह विल्हेवाट लावली. पोलिसांनी शर्टाच्या टेलर टॅगवरून मृतदेहाची ओळख पटवली. राजगड पोलिसांनी आठ तासात आरोपींना अटक केली.

नेमकं काय घडलं?

पती रात्री झोपलेला असताना प्रियकर अचानक तिला भेटण्यासाठी घरी आला. प्रियकराच्या येण्याची कुणकुण लागल्यामुळे जाग आली. त्यानंतर झालेल्या भांडणातून पतीची हत्या करण्यात आली. पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पतीचा मृतदेह थेट नदीत फेकून दिला. सिद्धेश्वर बंडू भिसे असे मृत पतीचे नाव आहे. तर आरोपी योगिता सिद्धेश्वर भिसे आणि शिवाजी सुतार यांना राजगड पोलिसांनी ठोकल्या बेड्या आहे.

उत्तर प्रदेशात पतीच्या मदतीने केली प्रियकराची हत्या

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये प्रेयसीने पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराची हत्या केली. पत्नीने आधी प्रियकाराला फोन करून बोलावलं. त्यानंतर घरात पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळून हत्या केली. या हत्येचं रहस्य दीड महिन्यांनी उलगडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका; गिरणा नदीच्या पुरात हजारो झाडे जमीनदोस्त, शेतकरी संकटात

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी नेस्कोमध्ये होणार

Thane To Buldhana Travel: ठाण्यावरुन बुलढाण्याला प्रवास कसा करायचा? रेल्वे, खाजगी बस आणि टॅक्सी जाणून घ्या सर्व मार्ग

Symptoms of Heart Attack: महिनाभर आधीच दिसतात हार्ट अटॅक लक्षणं, या ५ संकेताकडे दुर्लक्ष करू नका

Pandharpur : सोलापूरमध्ये पावसाचा जोर, पंढरपुरातील चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली |VIDEO

SCROLL FOR NEXT