Shivsena Vs Shinde Group news  saam tv
मुंबई/पुणे

Shivsena Vs Shinde Group : सेना-शिंदे गटाचा वाद चिघळला; सदा सरवणकरांचे दादरमधील बॅनर फाडले

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या दादर येथील कार्यालयावर काही लोकांनी दगडफेक केली आहे.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

Shivsena Vs Shinde Group News : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या दादर येथील कार्यालयावर काही लोकांनी दगडफेक केली आहे. दगडफेक करणाऱ्यांनी स्वतःच याचा व्हिडिओ काढत सोशल मीडियावर शेअर केला आहे. दादर गोखले रोड वरील सरवणकर यांचे कार्यालय बंद असतांना ही दगडफेक करण्यात आली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थकांकडून ही दगडफेक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई - शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील धुसफूस आता चांगलीच वाढू लागली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद टोकाला गेल्याचं दिसून येतं आहे. काल रात्री देखील मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. त्यानंतर आज, रविवारी दुपारच्या दादर परिसरातील आमदार सदा सरवणकर यांच्या दादर येथील कार्यालयावर काही लोकांनी दगडफेक केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाबाहेरील बॅनर देखील फाडण्यात आले आहेत. तसेच सदा सरवणकर यांचा पुत्र समाधान सदा सरवणकर यांचाही बॅनर फाडण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काल, शनिवारी रात्री देखील मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. हा वाद मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा देखील आरोप आहे. मात्र, सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत. एका घरगुती प्रकरणाचा वाद झाल्याचं सरवणकर यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT