Uddhav Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray On Opponents: शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, पण श्रीराम माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

Ram Navami News: रामनवमीनिमित्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्रीवर एकत्र जमले होते.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News: शिवसेनेचा धनुष्यबाण काही काळासाठी चोरला आहे, पण श्रीराम माझ्यासोबत आहेत. कागदवरच धनुष्यबाण नेला असला तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत, ही ब्रह्मास्त्र माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. रामनवमीनिमित्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्रीवर एकत्र जमले होते. त्यांना उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं.

त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होते. आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.  (Latest Marathi News)

लोकशाही वाचवणं माझं एकट्याचं काम नाही. पुढील पिढ्यांसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल. जातीस्त जास्त माणसं एकत्र आले तर लंका दहन नक्की होईल. देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाली आहे. मात्र हे स्वातंत्र्य फक्त 75 वर्षांसाठी होतं का? पुढच्या पिढ्यांना आपण काय उत्तर देणार आहोत, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती केला.

संविधान बचाव नाही, तर मी संविधानंच संरक्षण करणार हा आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे. तुमचा आशीर्वाद असाच असुद्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत'; मोदी-फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा

Pune Roads Pothole: खड्ड्यांनी घेतला शाळकरी मुलाचा जीव; वडिलांसोबत ट्युशनला जाताना घडली दुर्घटना

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT