Bhaskar Jadhav Latest Statement Saam TV
मुंबई/पुणे

'शिंदे गटाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपशीच संघर्ष करावा लागेल'

शिवसेनेचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने गोठवल्यापासून उद्धव ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार आरोप केले जात आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जितेश कोळी -

रत्नागिरी: शिंदे गटाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी भविष्यात भारतीय जनता पक्षासोबतचं संघर्ष करावा लागेल, आमच्याशी संघर्ष करण्याएवढी ताकद देखील त्यांच्यामध्ये उरणार नाही, असं भाकीत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना केलं आहे.

शिवसेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार करत शिवसेनेचे देखील दोन भाग केले, एवढेच नव्हे तर शिवसेनेवर दावा सांगितला. शिंदेच्या या दाव्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास देखील परवानगी मिळाली नाही.

पाहा व्हिडीओ -

शिवसेनेचे चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगाने गोठवल्यापासून उद्धव ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार आरोप केले जात आहेत. शिंदे गटाला हाताशी धरुन भाजप शिवसेना उद्ध्वस्त करु पाहत असल्याचा आरोप भाजपवरती केला जात आहे.

अशातच आता भास्कर जाधव यांनी मोठं भाकीत केलं आहे. भाजपची आजपर्यंतची निती आणि वर्तवणूक पाहता शिंदे गटाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपशीच संघर्ष करावा लागणार असल्याचं जाधव म्हणाले आहेत.

शिवाय भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आत्तापर्यंत केलेल्या विधानांचा विचार शिंदे गटाने करायला हवा असं देखील भास्कर जाधव म्हणाले आहेत. भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा यांनी मागील काही दिवसांपुर्वी प्रादेशिक पक्ष संपवणार असल्याचं वक्तव्य केलं होतं याची आठवण जाधव यांनी यानिमित्ताने शिंदे गटाला करुन दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT