Sudhir Mungantiwar And Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

मी म्हणजे राजा, हे वागणं बरं नव्हं; मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

'माझं कुटुंब माझी जबाबदारी न म्हणता, माझा पक्ष माझी जबाबदारी म्हणायला हवं'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे: मी म्हणजे राजा आहे हे वागणं बरोबर नाही, असं म्हणत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. सेनेचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगासह भाजपवरती गंभीर आरोप केले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात निराशेचे वातावरण आहे. मी म्हणजे राजा आहे हे वागणं बरोबर नाही, चिन्हाबद्दल मला कायदेशीर माहिती नाही. मात्र, शिवसेनेने केलेले आरोप हास्यास्पद असून त्यांच्या बाजूने निकाल लागली की, लोकशाही जिवंत आणि विरोधात आला की तिथे भाजपचा हाथ आहे असं ते म्हणतात.

पाहा व्हिडीओ -

तसंच शिवसेना घेत असलेल्या दुटप्पी भूमिकेमुळे संकुंचीत होत चालली आहे. ज्या शिवसेनेमध्ये जय भवानी, जय शिवाजी'चे नारे दिल्यावर तरुणांमध्ये एक उत्साह संचारत होता. त्याच शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटामुळे एक निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. मला विश्वास आहे की भाजपला दोष देण्याऐवजी स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करत आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना वेळ द्यायला हवा.

मी माझ्या पक्षाचा राजा आहे अशी भूमिका न ठेवता पक्षाच्या परिवाराची प्रमुखाची भूमिका घेतली तर असे प्रसंग पुन्हा होणार नाहीत. 'माझं कुटुंब माझी जबाबदारी न म्हणता माझा पक्ष माझी जबाबदारी म्हणायला हवं' अशी टीका करत त्यांनी ठाकरेंना सल्ला देखील दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT