shivsena crisis news  saam tv
मुंबई/पुणे

आतापर्यंत धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक का लढवली ? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

आज मुख्यमंत्र्यांनी मला निवडणुकीत जिंकण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज नाही,असे वक्तव्य केलं आहे. त्यावर आता शिवसेनेच्या प्रवक्या मनिषा कायंदे (Manisha kayande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत सोनावणे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बंडाळीनंतर राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. आमदार आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. तर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांना देत आहेत. तर दुसरीकडे आज मुख्यमंत्र्यांनी मला निवडणुकीत जिंकण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज नाही,असे वक्तव्य केलं आहे. त्यावर आता शिवसेनेच्या प्रवक्या मनिषा कायंदे (Manisha kayande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Political news In Marathi )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील पुरंदर येथील सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, 'मला निवडणुकीत जिंकण्यासाठी कोणत्याही चिन्हाची गरज नाही. एवढं मी काम करून ठेवलं आहे'. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनिषा कायंदे म्हणाल्या, ' निवडणुकीत जिंकण्यासाठी चिन्हाची गरज नाही, तर आतापर्यंत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक का लढवली ? मग शिवसेना चिन्ह सोडून निवडणूक का लढवली नाही. एकनाथ शिंदे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. दिल्लीश्वर आणि ४० आमदारांना सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. धनुष्यबाण हिसकावून घेणे इतकं सोपं नाही. धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही, हे त्यांना आता कळून चुकलं आहे.उद्याच्या सुनावणीबाबत आशादायी आहोत'.

खरी शिवसेना कोणाची ? उद्या सुप्रीम कोर्टात होणार फैसला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळीनंतर शिवसेना पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. या वादामुळे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी बुधवार ३ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना शुक्रवारी ८ ऑगस्ट २०२२ रोजी म्हणणे निवडणूक आयोगासमोर मांडण्यास नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिवसेनेने या नोटीसच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

अजित पवारांचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला संशय, राजकीय वर्तुळात खळबळ

Cancer Medicines: कॅन्सर पेशंटना नवसंजीवनी; जीव वाचवणारी १७ औषधं स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT