Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : शिंदे गट शिवसेना भवनावरही आला तर.., संजय राऊत कडाडले!

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून बुधवारी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Live : मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यावरून बुधवारी शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाला. महापालिकेतील शिवसेना कार्यालयात कोणीच नसल्याचं पाहून शिंदे गटाचे (Eknath Shinde) नेते आपल्या कार्यकर्त्यांसह पालिकेत घुसले. याची माहिती मिळताच, शिवसैनिकही दाखल झाले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'शिंदे गटाचे पदाधिकारी घुसखोरच आहेत. त्यांचं स्वत:च अस्तित्व नसून, सगळीकडे घुसखोरी करण्यात येत आहे. ही झुंडशाही आणि मस्तवालपणा हा सत्ता असल्यामुळे आहे. सत्तेशिवाय समोरासमोर या मग दाखवतो, असं आव्हान संजय राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे.

पुढे बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, 'गद्दारांची जगभरात एक पद्धत आहे, ते कुठेही घुसतात. महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून, पक्ष एकत्र आहे. महापालिकेतील प्रशासकांनी सर्व पक्षाच्या कार्यालयाला सील केलं, ते कोणत्या कायद्याने केलं. याबाबतची नोटीस दिली का? ही मनमानी आहे'.  (Maharashtra Political News)

'हे कोणच्या आदेशाने सुरु आहे. याला कायद्याचं राज्य म्हणत नाही. तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल. तर, ठोकशाहीच्या राज्यात शिवसेनेचं प्रगस्तीपुस्तक चांगल्या मार्काचं आहे. ठोकशाहीत कोणी स्पर्धा करू नका. पालिकेतील कार्यालय शिवसेनेचं राहणार आहे', असं संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं आहे.

शिंदे गट शिवसेना भवनाकडे आला तर..,

दरम्यान, महापालिकेतील कार्यालयाप्रमाणेच हळहळू शिंदे गट शिवसेना भवनावरही ताबा मिळवेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, संजय राऊत चांगलेच संतापले. शिवसेना भवनावर ताबा कोण घेणार, शिवसेना भवन हे शिवसैनिकांचं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू आहे. आणि ती बाळासाहेब ठाकरेंच्या नावानेच राहिल. ती आमची आहे, असं संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT