Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

...तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच संवाद साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३३ शिवसेना आमदार गुवाहटीमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुत्व सोडल्याची चर्चा सुरू आहेत, अस मी काय केले आहे की मी हिंदुत्वापासून बाजूला गेलो आहे. गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री पदावर आहे. आता माझ्यासोबत मंत्रिमंडळात आहेत ते बाळासाहेब यांच्यासोबत असणारेच शिवसैनिक आहेत. मला कशाचाही अनुभव नसताना जबाबदारी जिद्दीने पार पाडली.

'काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी म्हणाली आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको आहेत ते बाहेरच्या पक्षातील आहेत समजू शकतो. आज सकाळी मला शरद पवार यांनी फोन केला होता, ते म्हणाले उद्धव आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे बाहेरची माझ्यासोबत आहेत, मग माझ्याच माणसांना मी मुख्यमंत्री पदी का नको आहे. मग हे सगळ सांगण्यासाठी सुरतला का जावे लागते, बंडखोर केलेल्या एकाही आमदाराने मला समोर येऊन सांगाव मुख्यमंत्री तुम्ही नको, तर मी लगेच मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, गुवाहटीला गेलेल्या आमदारांनी येऊन माझा राजीनामा घेऊन राजभवनात द्या. मला कोरोना झाला आहे म्हणून मी राजभवनात जाऊ शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT