Uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द

राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सांवत

मुंबई : राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना (Shivsena) गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे. ( shivsena Political Crisis News In Marathi)

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधीमंडळ पक्षाचे गटनेते पद म्हणून मान्यता रद्द केली आहे. आता त्याजागी पुन्हा एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती कायम ठेवली आहे. तसेच आमदार सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती रद्द करून त्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव शिवदर्शन साठ्ये यांनी दिली. हा निर्णय उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

SCROLL FOR NEXT